हिमंता बिस्वा सरमा हे देशातील सर्वात भ्रष्ट मुख्यमंत्री, राहुल गांधी यांची टीका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्या पत्नीकडे तीन देशांचे पासपोर्ट असल्याचा आरोप काँग्रेस प्रवत्ते पवन खेरा यांनी केला होता. त्यानंतर पवन खेरा यांच्या घरावर आसाम पोलिसांनी छापेमारी केली होती. तसेच त्यांच्या विरोधात गुन्हेही दाखल झाले आहेत. या प्रकरणात उच्च न्यायालयाने त्यांना अटकपूर्व जामीन मंजूर केलेला आहे. त्यावर बोलताना लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आसामचे मुख्यमंत्री व सत्ताधारी भाजपवर जोरदार टीका केली आहे.

”आसामचे विद्यमान मुख्यमंत्री हे देशातील सर्वात भ्रष्ट मुख्यमंत्री आहेत. ते कायद्याच्या कचाट्यातून सुटणार नाहीत. आपल्या राजकीय विरोधकांना आणि टीकाकारांना त्रास देण्यासाठी त्यांनी सत्तेचा केलेला गैरवापर हा संविधानाच्या विरोधात आहे. जे प्रश्न उपस्थित केले जात आहेत, त्यांची चौकशी होणे आवश्यक आहे. पारदर्शकता, सत्तेचे उत्तरदायित्व आणि कायद्याचे राज्य हे आपल्या संविधानिक घटनेवर आधारित आहेत. काँग्रेस पक्ष पवन खेरा यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. आम्ही अशा धमकावण्यांना घाबरणार नाही”, असे राहुल गांधी यांनी ट्विट केले आहे.