जवानांना नॉन बुलेटप्रूफ ट्रक आणि मोदींना 8400 कोटींचे विमान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशाच्या जवानांना नॉन बुलेटप्रूफ ट्रकमधून शहीद होण्यासाठी सीमेवर पाठवलं जातंय, तर दुसरीकडे पंतप्रधानांसाठी 8400 रुपये खर्चून आलीशान किमान मागकलं जात आहे, अशा शब्दांत कॉँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे.

कॉँग्रेस नेते राहुल गांधी यांनी एक व्हिडीओ राहुल ट्विटरवरून शेअर केलाय. या व्हिडीओत एका ट्रकमध्ये जवान बसलेले दिसत आहेत. ते एकमेकांशी बोलताना दिसत आहेत. यामध्ये एक जकान ‘‘नॉन बुलेटप्रूफ गाडय़ांमधून पाठकून आपल्या जीवासोबत खेळलं जातंय’’ असं म्हणताना दिसत आहे. जवानांना आवश्यक सुविधा मिळत नाहीत आणि मोदींसाठी आलीशान विमान हा न्याय आहे का? असा प्रश्न राहुल गांधी यांनी उपस्थित केला आहे.

हिंदुस्थान-चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर देशाच्या जकानांना मिळणाऱया सुविधांकडे राहुल गांधी यांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. पंतप्रधानांसाठी 8400 कोटी रुपयांचं विमान खरेदी केलं. एवढय़ा मोठय़ा रकमेत सियाचेन- लडाख सीमेवर तैनात आपल्या जवानांसाठी गरम कपडे, जॅकेट, बूट, ग्लोव्हज्, ऑक्सिजन सिलिंडर आदी गोष्टी खरेदी करता आल्या असत्या. मात्र पंतप्रधानांना केवळ स्वतःच्या प्रतिमेची काळजी आहे, सैनिकांची नाही अशी टीका त्यांनी यापूर्वी केली होती.