
वेळ न दवडता ठोस पावले उचलावीत, पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर अशी सूचना लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारला केली आहे. मंगळवारी केंद्र सरकारच्या जातीय जनगणनेच्या निर्णयानंतर दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत ते असं म्हणाले आहेत.
राहुल गांधी म्हणाले, “हा हल्ला थंड डोक्याने केलेला नरसंहार आहे. हा हिंदुस्थानच्या आत्म्यावर हल्ला आहे. यासाठी जबाबदार असलेल्यांना त्याची किंमत मोजावी लागेल. सरकारने वेळ वाया घालवू नये.” ते म्हणाले, “त्यांना (दहशतवाद्यांना) हे समजून घ्यावे लागेल की, हे हिंदुस्थानसोबत करता येणार नाही. जे घडले ते कोणत्याही परिस्थितीत स्वीकारता येणार नाही.”
राहुल गांधी म्हणाले की, या कठीण काळात संपूर्ण विरोधी पक्ष सरकारसोबत उभा आहे. ते म्हणाले, ”विरोधी पक्ष सरकारला 100 टक्के पाठिंबा देत आहे. आता पंतप्रधान मोदींनी निर्णायक पाऊल उचलले पाहिजे. वेळ न दवडता ठोस पावले उचलावीत.”