Video- ‘सर’ मत कहो ना… राहुल गांधींची ‘त्या’ तरुणीला विनंती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । चेन्नई

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा चेन्नईमध्ये आज वेगळाच अंदाज पाहायला मिळाला. राहुल गांधी यांनी चेन्नईतल्या स्टेला मेरी कॉलेजमधील विद्यार्थिनींशी संवाद साधला. यावेळी एका विद्यार्थिनीने राहुल यांना ‘सर’ म्हणून संबोधले. त्यावर मला ‘सर’ ऐवजी फक्त ‘राहुल’ म्हणाल का? अशी विनंती राहुल यांनी केली. राहुल यांनी अचानक केलेल्या विनंतीमुळे प्रश्न विचारणारी मुलगी पुरती लाजली आणि सभागृहात एकच हशा पिकला. प्रश्न विचारताना या विद्यार्थिनीने पुन्हा राहुल यांचा एकेरी उल्लेख केला आणि तिला खुदकन हसायला आले. तेव्हा सभागृहातील अन्य विद्यार्थिनींनी एकच कल्ला केला. राहुल गांधींना प्रश्न विचारणाऱ्या विद्यार्थिनीचे नाव आझरा असून ती फायनान्सची विद्यार्थिनी आहे.

राहुल गांधी आज तामिळनाडूत सभा घेणार आहे. लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर ते पहिल्यांदाच दक्षिणेत सभा घेणार आहेत. कन्याकुमारी येथील सभेअगोदर राहुल गांधी यांनी चेन्नईतील स्टेला मेरी कॉलेजमधील विद्यार्थिनींशी संवाद साधला. जीन्स आणि टी शर्ट परिधान केलेले राहुल अगदी कॉलेज तरुणांना शोभेल अशा पोषाखात आले होते. यावेळी स्टेला मेरी कॉलेजमधील विद्यार्थिनींनी विचारलेल्या प्रशांची राहुल यांनी दिलखुलास उत्तरे दिली.