
नॅशनल हॅराल्डमधील कथित मनी लॉन्डरिंग प्रकरणात काँग्रेस नेते राहुल गांधी यांची आज ईडीने चौथ्यांदा चौकशी केली. राहुल गांधी सकाळी 11 वाजता ईडी कार्यालयात पोहोचले तर दुपारी पावणेपाच वाजता चौकशी पूर्ण झाली. चौकशीदरम्यान त्यांना एक तासाचा ब्रेक देण्यात आला होता. राहुल गांधी यांची आतापर्यंत 35 तास चौकशी करण्यात आली असून त्यांचे विविध जबाब नोंदवण्यात आले आहेत. दरम्यान, याच प्रकरणात ईडी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांची 23 जूनला चौकशी करणार आहे.