जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांचा रुद्रावतार, गोंधळ घालण्याऱ्या रुग्णाच्या नातेवाईकांना शिकवला धडा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना लागण झालेल्या एका रुग्णाचा आज बीड जिल्हा रुग्णालयात उपचार घेताना मृत्यू झाल्यानंतर मृत व्यक्तीच्या नातेवाईकांनी रुग्णालयात गोंधळ मांडला. जिल्हाशल्य चिकित्सक दाखल झाले मात्र नातेवाईक ऐकत नसल्याने जिल्हाधिकारी राहुल रेखावार जिल्हारुग्णलयात पोहोचले , शांत संयमी रेखावार यांचा रुद्रावतार सर्वांनीच अनुभवला व त्यानंतर पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

बीडच्या जिल्हारुग्णलयात उपचार घेणारा कोरोनाग्रस्त रुग्ण आज मृत पावला याची माहिती मिळताच रुग्णाच्या नातेवाईकांनी जिल्हारुग्णालयासह कोव्हीड सेंटर डोक्यावर घेतले , अर्धा तास हा गोंधळ सुरू होता, नातेवाईक जिल्हाशल्य चिकित्सक अशोक थोरात यांच्या सह आरोग्य अधिकाऱ्यांना वेठीस धरत होते घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी राहुल रेखावार जिल्हा रुग्णालयात दाखल झाले , गोंधळ घालणाऱ्या नातेवाईकांना फैलावर घेतले, कोव्हीड सेंटर परिसरात गोंधळ घालून कोरोना घरी घेऊन जात आहात, आरोग्य यंत्रणा जबाबदारीने काम करत आहे, त्यांना वेठीस धरण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला म्हणत आपला रुद्रावतार दाखवला, जिल्हाधिकारी रुग्णालयात येताच पोलीस दल ही तैनात झाले गोंधळ घालणाऱ्या पाच जणांना ताब्यात घेण्यात आले