ग्रँट रोडच्या ‘गोल्डन गुस’ बारवर कारवाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक

सामना प्रतिनिधी, मुंबई

दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर शहरात कुठेही दारू किंवा अन्य माध्यमातून नागरिकांना आमिष दाखविण्याचा प्रयत्न होऊ नये यासाठी मुंबई पोलिसांनी धडक कारवाया सुरू केल्या आहेत. शुक्रवारी रात्री गुन्हे शाखेच्या पथकाने ग्रँट रोड येथील बारवर कारवाई करून आठ बारबालांची सुटका केली.

ग्रँट रोड रेल्वे स्थानकाबाहेर स्लॅटर मार्गावर ‘गोल्डन गुस’ बार असून तेथे एकाच वेळी मोठय़ा संख्येने बारबाला असतात. शिवाय तेथे तळीरामांची संख्यादेखील वाढत असल्याच्या तक्रारी वरिष्ठ अधिकाऱयांकडे येत होत्या. याची दखल घेऊन गुन्हे शाखेच्या एका पोलीस उपायुक्ताने शुक्रवारी रात्री त्या बारवर छापा टाकला. त्यावेळेस तेथे 31 ग्राहक आणि 8 बारबाला सापडल्या. तसेच बारमधून 91 हजारांची रोकड जप्त करण्यात आली. अंधेरीतील ‘सरोज’ बारवर धडक कारवाई केल्यानंतर शुक्रवारी ग्रँट रोडच्या ‘गोल्डन गुस’ बारवर कारवाई करण्यात आली.