Raigad News – इर्शाळगडावर ट्रेकिंगला गेलेल्या तरुणाचा दरीत पडून मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

खालापूर येथील इर्शाळगडावर ट्रेकिंगसाठी गेलेल्या तरुणाचा दरीत पडून मृत्यू झाला आहे. आकाश राजेंद्र वाघमोडे (26) असे मयत तरुणाचे नाव असून तो भिवंडी येथील रहिवासी आहे. याप्रकरणी खालापूर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

आकाश खालापूरातील इर्शाळवाडी येथे रविवारी ट्रेकिंगसाठी गेला होता. आकाशने दुचाकी डोंगराच्या पायथ्याशी लावली आणि गडावर ट्रेकिंगला गेला. संध्याकाळ झाली तरी आकाशशी संपर्क न झाल्याने कुटुंबीयांनी खालापूर पोलिसांना माहिती दिली. खालापूर पोलीस निरीक्षक सचिन पवार यांनी खोपोली व रसायनी येथील सामाजिक संस्थेच्या कार्यकर्त्यांना याबाबत माहिती दिली. यानंतर इर्शाळगडावर शोध मोहीम राबवण्यात आली. आकाशच्या मोबाईलवर त्याला संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मोबाईलची रिंग वाजत होती, मात्र रिसिव्ह केला जात नसल्याने मोबाईल वरून शोध घेतला. अखेर सोमवारी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास आकाशचा मृतदेह आढळला.