रेल्वे प्रवाशांना पावसाचा अंदाज आता मोबाईलवर मिळणार!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधीक फोटो

सामना ऑनलाईन, मुंबई

रेल्वे प्रवाशांना अतिवृष्टीचा इशारा देण्यासाठी हवामान खात्याबरोबर मध्य रेल्वेने सहकार्य करीत मोबाईल ऍप विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रवाशांना त्यांच्या मोबाईलवर आता पावसाची अपडेट मिळणार आहे. दरम्यान, पावसाचा अचूक अंदाज वर्तविण्यासाठी पर्जन्य मोजमाप करणारी ‘रेन गेज’ यंत्रणा बसविण्यासाठी पश्चिम रेल्वेवर दहा ठिकाणी सर्व्हेक्षण पूर्ण करण्यात आले असून मध्य रेल्वे पुढच्या आठवडय़ात याबाबतचे सर्व्हेक्षण करणार आहे.