रेल्वेचे कोरोनामुक्त कोचेस तयार!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

भारतीय रेल्वेने कोरोनाचा साथीच्या प्रादुभार्वापासून वाचण्यासाठी कोचेसच्या प्रसाधनगृह, अन्य वॉश बेसिन आणि दरवाजांच्या कडय़ांपासून सर्व गोष्टी हाता ऐवजी पायाने वापरता येतील असे बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी कपूरतला येथील रेल्वे कोच फॅक्टरीत एक एसी आणि एक नॉन एसी डबा असे दोन डबे प्रायोगित तत्वावर तयार केले आहेत. त्यामुळे हाताचा कमीत कमी वापर होणार असल्याने कोरोनाच्या संसर्गापासून वाचता येणार आहे.

या कोचेसमधील प्रसाधनगृहाच्या दरवाजाच्या कड्या हाताऐवजी पायानेही लावता येतील अशी सोय करण्यात आली आहे. हे दोन कोच जयपूरला पाठविण्यात आले आहे. या कोचेसच्या एसी डक्टमध्ये प्लाझमा एअर प्युरिफायर बसविण्यात आल्याने आपोपाच व्हायरस, बॅक्टेरीया आाणि हवेतील जीवजंतू नष्ट होण्यास मदत होणार आहे.

ट्रेनच्या बोगीमधील हाताचा स्पर्श होणाऱया वस्तूंना टायटॅनियमच्या डायऑक्साईडचे आवरण देण्यात आले आहे. त्यामुळे या कोचमधील हवेची गुणवत्ता सुधरणार तर आहेच शिवाय टायटॅनियम डायऑक्साईडच्या कोटींगमूळे हाताचा स्पर्श होणाऱया वस्तूंवर द्रवपदार्थ मिक्स असणाऱया टायटॅनियम डायऑक्साईडच्या थरामुळे व्हायरस, जीवाणू आणि बुरशीजन्य जीवजंतू मारले जाणार आहेत. आसने, बर्थ, प्रसाधन गृह, स्नॅक टेबल, खिडक्या आणि लादीला हा टायटॅनियम डायऑक्साईडचा थर लावला जाणार आहेत.