ई-तिकीट केंद्रावर धाड, तिकीट विक्रीचा काळाबाजार उघड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नागपूर

नागपूर विभागाच्या गुन्हे गुप्त शाखेने स्थानिक पोलिसांच्या सहकार्याने वरूड येथील दोन ई-तिकीट केंद्रावर धाड टाकून काळाबाजार उघडकीस आणला. बनावट ओळखपत्राच्या आधारे ई तिकीटाची चढया दराने विक्री केली जात होती.

पहिली कारवाई कल्पतरू सर्व्हीसेस नामक ई तिकीट केंद्रावर करण्यात आली. हेमंत गोपालराव घंगारे (35) हा आयआरसीटीसीचे लायसन्स आड 18 बनावट ओळखपत्राच्या आड ई-तिकिट काढत होता. त्याच्याकडून 20 लाईव्ह वापरायोग्य तिकीटं जप्त करण्यात आली असून त्यांची किंमत 31 हजार 319 आहे. याशिवाय बनावट ओळखपत्राच्या आधारे 1 लाख 30 हजाराची तिकीट काढल्याचे पुढे आले आहे. या केंद्रावर आतापर्यंत 1 लाख 62 हजाराची तिकीट काढण्यात आले आहेत. दु

सरी कारवाई आर्या टूर अ‍ॅन्ड ट्रॅव्हल्सवर करण्यात आली. चेतन राउत (29) हा आयआरसीटीसीचे लायसन्स नसताना बनावट ओळखपत्राव्दारे ई-तिकीट काढून त्याची विक्री करत होता. तपासात 9 तिकीटं अवैधरित्या काढले असून त्याची किंमत 17 हजार 42 आहे. दोन्ही कारवायात रेल्वे सुरक्षा दलाने 32 हजार 869 रूपये किंमतीची 22 लाईव्ह तिकीटं, यापूर्वी काढलेले 1 लाख 45 हजार 909 रूपये किमतीची 92 तिकीटे असे एकूण 114 तिकटं रेल्वे सुरक्षा दलाच्या हाती लागले आहेत. याशिवाय अधिक तपासाकरिता ई-तिकीट केंद्रातील साहित्य जप्त करण्यात आले आहेत. दोन्ही प्रकरणात रेल्वे सुरक्षा दलाने रेल्वे अ‍ॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.