रेल्वेच्या ‘पीआरएस’ सिस्टममध्ये तीस वर्षांनंतर बदल होणार, लांब पल्ल्याच्या प्रवाशांना विनाव्यत्यय तिकीट मिळणार

रेल्वेसाठी सॉफ्टवेअर विकसित करणाऱया ‘क्रिस’ या संस्थेने रेल्वेच्या प्रवासी आरक्षण यंत्रणेचे (पीआरएस) अत्याधुनिकीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. नव्वदच्या दशकापासून रेल्वे ‘पीआरएस’साठी वापरले जाणारे कालबाह्य सॉफ्टवेअर बदलून त्याजागी वेब बेस्ड सॉफ्टवेअर वापरले जाणार आहे. त्यामुळे अचानक तिकीट यंत्रणेत कोणताही बिघाड झाल्यास अन्य संगणकांवरही काम करणे शक्य होईल व तिकीट रिझर्व्हेशन खिडक्यांवरील प्रवाशांचा खोळंबा टळणार आहे.

रेल्वेची आयटी विंग समजली जाणारी ‘क्रिस’ (सेंट्रल फॉर रेल्वे इन्फॉर्मेशन सिस्टम) ही संस्था ‘पीआरएस’साठी नवे क्लाऊड तंत्रज्ञान वापरणार आहे. यासाठी आधी व्हीएएक्स ‘वॅक्स’ हे सॉफ्टवेअर वापरले जात होते. आता तिकिटिंगसाठी वेब बेस्ड तंत्रज्ञान वापरले जाणार आहे. त्यामुळे तिकिटिंग सिस्टममध्ये एखादा बिघाड झाला तर लागलीच कोणत्याही पर्यायी संगणकावर काम करता येणार आहे. त्यामुळे ‘पीआरएस’ पेंद्रावर आरक्षित तिकिटांच्या रांगेत उभे राहणाऱयांना ताटकळावे लागणार नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

‘क्रिस’ काय करते…
 रेल्वेच्या रोजच्या दोन कोटी प्रवाशांच्या तिकिटांची गरज भागवते.
 ‘क्रिस’मुळेच दर मिनिटाला 25 हजारांहून अधिक तिकिटांचे ऑनलाईन बुकिंग होते.
 दर दिवशी चौकशीचे 20 कोटींहून अधिक कॉल अटेंड करणे.
 वाहतूक व परिवहन, प्रवासी डबे, क्रू मेंबर्सचे डिजिटली नियंत्रण.
 इस्रोच्या सॅटेलाइटद्वारे रेल्वेगाडय़ांचे रिअल टाइम ट्रकिंग.
 देशभरातील 2.8 लाख मालडब्यांची निगराणी करणे.