
सामना प्रतिनिधी । मुंबई
हिंदुस्थानी रेल्वेनेही प्रवाशांना त्यांच्या पसंतीनुसार सीट निवडता यावी यासाठी ‘ऑनलाईन चार्ट’ सेवा सुरू केली आहे. त्यामुळे प्रवाशांना तिकीट आरक्षित करतानाच आरक्षणाच्या सद्यस्थितीची माहिती मिळणार आहे.
रेल्वेच्या या नव्या सेवेद्वारे प्रकाशांना गाडीच्या डब्याचे ग्राफिक्स तसेच बर्थनुसार तपशील पाहता येईल. यासाठी रेल्वेच्या http://www.irctc.co.in kej CHARTS / VACANCY वेबसाईटवर असा एक नवा पर्याय सुरू करण्यात आला आहे. या नव्या सेवेद्वारे आरक्षित केलेल्या जागा आणि उपलब्ध असलेल्या जागा वेगवेगळ्या रंगांनी दाखविल्या जाणार आहेत. ‘मोबाइल इंटरनेटवरही ही यंत्रणा उपलब्ध असणार आहे, यामुळे रेल्वे तिकीट आरक्षणाच्या प्रक्रियेत पारदर्शकता येईल, असे केंद्रीय रेल्वे मंत्री पीयुष गोयल यांनी सांगितले.
शताब्दी आणि राजधानी गाड्यांमध्ये ही सेवा लवकरच उपलब्ध होणार आहे. उपलब्ध आसनांबाबत ऑनलाइन माहिती उपलब्ध असेल, त्यामुळे तिकीट तपासनीसाला शोधण्याची गरज राहणार नाही. ही यंत्रणा सगळ्या गाड्यांबाबत उपलब्ध करण्यात येणार आहे.























































