मुंबई आणि परिसरात मुसळधार पाऊस

913

दिवसभर विश्रांती घेतलेल्या पावसाने सोमवारी रात्री मुंबईत विजांच्या कडकडाटासह हजेरी लावली. ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह पडलेल्या पावसाने मुंबईला झोडपून काढले. मुंबई उपनगर आणि परिसरात जोरदार पाऊस झाला. दक्षिण मुंबईत पावसाचा जोर जास्त होता.

मुंबईत काही दिवसांपासून पावसाच्या हलक्या सरी कोसळत होत्या. सोमवारी दिवसभर पावसाने विश्रांती घेतली होती. पावसाने विश्रांती घेतल्याने मुंबई-ठाण्यात मतदान सुरळीत पार पडले. मात्र रात्री 9.30 नंतर मुंबईत पावसाने जोर धरला. विजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह दक्षिण मुंबईसह मुंबई उपनगरात पावसाने हजेरी लावली. त्यामुळे मुंबईकारांची एकच धावपळ उडाली.

आपली प्रतिक्रिया द्या