सिंधुदुर्ग जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस; आंबा, काजू बागायतदार अडचणीत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सिंधुदुर्ग जिल्ह्यात हवामान विभागाच्या अंदाजानुसार अवकाळी पावसाने हजेरी लावली. सह्याद्रीच्या पट्ट्यात जोरदार अवकाळी पाऊस कोसळला. बुधवारी सायंकाळी 4 वाजल्यापासून वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. जिल्ह्यातील सर्वच भागात हा अवकाळी पाऊस लागल्याने बागायतदार अडचणीत येणार आहेत.

गेले काही दिवस हवामानात उष्मा निर्माण झाला होता. या अवकाळी पावसामुळे हवामानात गारवा निर्माण झाला आहे. विजांचा कडकडाट झाल्याने वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता. ऐन उन्हाळ्यात पावसाने हजेरी लावण्याने सर्वसामान्यांचे नुकसान होणार आहे. शेतकरी राजा आता आर्थिक अडचणीत येण्याची शक्यता आहे. तसेच या अवकाळी पावसाचे काजू आणि आंबा बागायतदार धास्तावले आहेत.