पावसाची विश्रांती, पालिकेचे काम सुरू

697

मुंबईत गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने आज विश्रांती घेतली. मात्र, दिवसभर ढगाळ वातावरण कायम होते. मात्र, बुधवारी झालेल्या वादळी पावसामुळे उन्मळून पडलेल्या शेकडो मोठ्या झाडांची नीट छाटणी, तोडणी करून ते उचलण्याचे काम पालिका कर्मचाऱ्यांकडून दिवसभर सुरू होते.

पावसामुळे ज्या सखल भागांत पाणी शिरले होते तेथील पर्जन्य जलवाहिन्यांमधील गाळ काढण्याचे कामही सुरू होते. दरम्यान, विचारे मार्गावरील ताडदेव आरटीओ रेसकोर्सच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावरील भले मोठे झाड कोसळले होते. त्यामुळे त्या मार्गाने जाणाऱ्या वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता.

 

आपली प्रतिक्रिया द्या