
संभाजीनगर जिल्ह्यासह मराठवाडा विभागात सर्वदूर पावसाने हजेरी लावली आहे. गेल्या तीन दिवसांपासून विभागात धो-धो पाऊस कोसळत नद्या-नाले दुथडी भरून वाहत आहेत, वावरातही सर्वदूर पाणीच पाणी दिसून येत आहे. या पावसामुळे बळीराजा सुखावला असून शेतकरी वर्गही खरीप पेरणीच्या तयारीला लागला आहे.
यंदाचा उन्हाळा तसा कडकच गेला. विभागाचे तापमान सरासरी ४६ अंश सेलसियशच्या पेढे गेले होते, त्यामुळे उन्हाळ्यामुळे परेशान झालेले नागरिक पाऊस कधी येतो याचीच वाट पाहात होता. मध्यंतरी अवकाळी पावसानेही येथे हजेरी लावली होती, मात्र यंदाच्या पाऊसाळी हंगामातील खNया अर्थाने पावसाला तीन दिवसांपासून सूरूवात झाली आहे. संभाजीनगर जिल्ह्यासह मराठवाड्यात सर्वदूर पाऊस कोसळत आहे. हा पाऊस खरीप पेरणी करण्यास पोषक असून बळीराजानेही ‘काळ्या आईची’ ओटी भरण्याची जोरदार तयारी सुरू केली आहे.
मराठवाडा विभागात १ जूनपासून आतापर्यंत सरासरी ६०.५८ मि. मी. पाऊस झाला आहे. आत्तापर्यंत विभागात सर्वाधिक १०८.५५ मि. मी. पाऊस संभाजीनगर जिल्ह्यात झाला असून सर्वात कमी पाऊस नांदेड जिल्ह्यात सरासरी ७२.७७ मि. मी. पाऊस झाला आहे. अन्य जिल्ह्यात पडलेला एवूâण पाऊस पुढील प्रमाणे आहे. धाराशिव – १०६.२० मि. मी., जालना – ८३.९६, परभणी – ७८.६६, हिंगोली – ७७.९९, बीड – ८७.४७ आणि लातूर जिल्ह्यात ९५.७५ मि. मी. पाऊस झाला आहे. आज सकाळी ८ वाजेपर्यंत विभागात सरासरी ६.०७ मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. शुक्रवारी सर्वाधिक १५.९० मि. मी. पाऊस संभाजीनगर जिल्ह्यात झाला असून त्या जिल्ह्यापाठोपाठ १३.१९ मि. मी. पाऊस धाराशिव जिल्ह्यात झाला आहे.
सात मंडळात अतिवृष्टीची नोंद
मराठवाडा विभागात पावसाचा जोर कायम असून संभाजीनगर, जालना जिल्ह्यातील ७ मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. यामध्ये संभाजीनगर तालुक्यातील करमाड-९१ मि. मी., हर्सूल – १०८, चिकलठाणा मंडळात ७३ मि. मी. पावस झाला असून सिल्लोड तालुक्यातील गोळेगाव मंडळात ६७ मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. जालना जिल्ह्यातील तीन मंडळात अतिवृष्टी झाली आहे. यामध्ये भोकरदन तालुक्यातील धावडा-६६, पिंपळगाव-७० आणि अनवा मंडळात ८५ मि. मी. पाऊस झाला आहे.
बळीराजा सुखावला
यंदाचा पावसाळी हंगाम समाधानकारक राहिल असा अंदाज यापुर्वीच हवामान खात्याने वर्तविला आहे, त्यांचा अंदाज हा मृग नक्षत्रात कोसळत असलेल्या धो-धो पावसाच्या सरीवरुन खरा ठरत आहे, असे मानले आहे. या जोरदार पावसामुळे बळीराजा सुखावला असून त्यांनी खरीप पेरणीची जोरदार तयारी सुरू केली आहे. पेरणी वेळेवर झाली तर कृषी उत्पादनाला बरकत येत, म्हणून पेरणीसाठी चांगल्या प्रतिचे बियाणे, खताची जमवा जमव करण्यास शेतकरी वर्गाने सुरूवात केल्याचे चित्र ग्रामीण भागात पाहिला मिळत आहे.




























































