मुंबईसह कोकणात पुढील दोन दिवस पावसाचा इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
rain-12

सामना प्रतिनिधी। मुंबई

बंगालच्या उपसागरात एक कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. यामुळेच विदर्भ, मराठवाडा, खान्देश आणि मध्य महाराष्ट्रातील बऱ्याच भागासह मुंबई व कोकणात 21 आणि 22 सप्टेंबर रोजी पाऊस पडेल, असा अंदाज हवामान तज्ञांनी व्यक्त केला आहे.

यादरम्यान गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, गोंदिया, भंडारा, हिंगोली, परभणी आणि जालना जिह्यांसह आसपासच्या भागात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. पावसाच्या या स्थितीमुळे नदी-नाल्यांना पूर येण्यासारखी स्थिती उद्भवू शकते त्यामुळे नदी-नाल्यांच्या काठी राहणाऱया लोकांना सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे. उर्वरित विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि खान्देशात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. मुंबई आणि कोकणातदेखील यादरम्यान पावसाच्या काही सरी कोसळतील. परंतु दक्षिण-मध्य महाराष्ट्र आणि दक्षिण मराठवाडय़ात पावसाची शक्यता कमी राहील. शेतकऱयांनी हवामानाच्या स्थितीनुसार शेतीचे नियोजन करावे, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.