राज ठाकरे यांना ‘ईडी’ची नोटीस

1328

कोहिनूर प्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना आज अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) नोटीस बजावली असून 22 ऑगस्ट रोजी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शिवाजी पार्क येथील कोहिनूर मिलच्या जमिनीचा 421 कोटींना लिलाव झाला. या प्रकरणी चौकशी करण्यासाठी राज ठाकरे यांना नोटीस पाठवण्यात आल्याचे ‘ईडी’ने स्पष्ट केले आहे.

ईडीचे पहिले आरोपपत्र
दरम्यान, इन्फास्ट्रक्चर लिजिंग ऍण्ड फायनान्शिअल सर्व्हिसेस (आयएलएफएस) मनी लाँडरिंग आणि 570 कोटी रुपयांच्या मालमत्तांची जप्ती या प्रकरणात अंमलबजाकणी संचालनालयाने (ईडी) पहिले आरोपपत्र दाखल केले आहे.

आयएलएफसी समूहातील अनेक कंपन्यांकर ईडीने 19 फेब्रुवारी रोजी मनी लाँडरिंगचा गुन्हा नोंदवला होता. या कंपन्यांच्या अनेक संचालकांना बेकायदेशीररीत्या लाभ दिल्याचा ईडीचा आरोप आहे. आयएलएफएसप्रकरणी ईडीने दिल्ली, मुंबई, चेन्नई आणि ब्रुसेल्स (बेल्जियम) येथील निवासी व व्यावसायिक इमारती आणि बँक खाती जप्त केली आहेत. आयएलएफएस फायनान्शिअल सर्व्हिसेस लि. (आयएफआयएन) कंपनीच्या संचालकांच्या या मालमत्ता आहेत. मालमत्ता जप्त झालेल्या संचालकांत रवी पार्थसारथी, रमेश बावा, हरी शंकरम, अरुण साहा आणि रामचंद्र करुणाकरन यांचा समावेश आहे. शिवशंकरन यांच्या कुटुंबीयांच्या आणि इतर नातेवाईकांच्या तसेच समूहातील काही कंपन्यांच्या मालमत्ताही ईडीने जप्त केल्या आहेत. जप्त मालमत्तांची एकूण किंमत 570 कोटी रुपये आहे.

आपली प्रतिक्रिया द्या