Corona रुग्णांसाठी रमझानचा रोझा तोडून माणुसकीचे दर्शन घडवले, वर्षभरात 17 वेळा प्लाझ्मा डोनेट

कोरोनाच्या महामारीत पुन्हा एकदा माणुसकीचे दर्शन पाहायला मिळाले आहे. एका भल्या माणसाने रुग्णांना प्लाझ्मा डोनेट करण्यासाठी रमझान महिन्यातला पवित्र रोझाचा उपवास तोडला आहे. त्यांच्या या कृतीचे सगळीकडूनच कौतुक होत असून त्यांच्या या धाडसी निर्णयाला लोकांनी सलाम केला आहे.

अकिल मंसूरी असे त्यांचे नाव असून ते सिव्हील कॉन्ट्रॅक्टर आहेत. राजस्थानच्या उदयपूर इथली ही घटना आहे. मंसूरी यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून निर्मला आणि अलका अशा दोन महिलांना ए प्लस प्लाझ्माची तत्काळ गरज असल्याचे कळले होते. त्यांनी वेळ न दवडता त्यांना प्लाझ्मा डोनेट करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्यांनी प्लाझ्मा डोनेट करण्याची इच्छा व्यक्त करत डॉक्टरांचा सल्लाही घेतला. डॉक्टरांनी त्यांचे अॅण्टीबॉडी टेस्ट करून ते प्लाझ्मा डोनेट करण्यासाठी निरोगी असल्याचे सांगितले. मात्र प्लाझ्मा डोनेट करण्याआधी काहीतरी खाण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. अखेर माणुसकी हिच खरी ईश्वर सेवा असल्याचे समजून त्यांनी त्या महिलांचा प्राण वाचवण्यासाठी खाऊन रमझानचा उपवास तोडला आणि त्या महिलांना प्लाझ्मा डोनेट करून त्यांचा प्राण वाचवला.

मंसूरी यांना गेल्यावर्षी कोरोनाचे संक्रमण झाले होते, त्यातून ते बरे झाले. त्यानंतर त्यांनी तीन वेळा प्लाझ्मा डोनेट केला करुन लोकांना जीवदान दिले आहे. 2020मध्ये कोविडमधून बरे झाल्यानंतर 17 वेळा त्यांनी रक्तदान करत माणुसकी जपली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या