जीसीसी बायोटेकच्या 12 लाख 50 हजार कोरोना चाचणी किटस् सदोष – राजेश टोपे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना संसर्गाची तपासणी करण्यात येणाऱ्या आरटी पीसीआरच्या 12 लाख 50 हजार किट्स सदोष आढळल्या आहेत. सदोष किट्सचा पुरवठा करणाऱ्या या कंपनीवर कारवाई करणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

‘राज्य सरकारने खरेदी केलेल्या जीसीसी बायोटेक कंपनीच्या किट्स सदोष असल्याचा रिपोर्ट एनआयव्हीने दिला. वैद्यकीय संचालनालयाकडून किट्सची खरेदी करण्यात येत असून जीसीसी बायोटेक या कंपनीच्या किट्सचा वापर तातडीने थांबवण्यात आला आहे. तसंच सदोष किट्सचा पुरवठा करणाऱ्या या कंपनीवर कारवाई करणार असल्याची माहिती टोपे यांनी दिली. ‘जिथे किट्सचं वाटप झालं आहे तेथील निकाल चुकीचे येण्यापेक्षा ते थांबवून तात्पुरतं एनआयव्हीने त्यांच्या किट्स उपलब्ध करुन द्यायचा असा निर्णय झाला आहे. जेणेकरुन टेस्टिंग थांबू नये. एनआयव्हीकडून सगळ्या टेस्ट केल्या जातील,’ अशी माहिती टोपे यांनी दिली.