105 वर्षांच्या आजी ऊजिबा यांनी कोरोनाला हरवले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाला घाबरू नका, तो माझे काहीही वाकडे करू शकणार नाही, असे धीरोदात्त उद्गार काढत राजकोटच्या गोंडल जिल्ह्यातील 105 वर्षीय आजी ऊजिबा गोंडालिया यांनी कोरोनाला मोठय़ा हिमतीने तोंड देत 9 दिवसांत पळवून लावले आहे. राजकोट जिल्ह्यातील गोंडल तालुक्याच्या सुलतानपूर गावातील मूळ निवासी आणि सध्या सुरतच्या निवासी 105 वर्षीय ऊजिबा 19 सदस्यीय एकत्र कुटुंबात राहत आहेत. स्वातंत्र्य संग्रामासह अनेक ऐतिहासिक घटनांच्या साक्षीदार असलेल्या ऊजिबा आजींच्या धैर्याने रुग्णालयातील कर्मचारीवर्गही प्रभावित झाला आहे.