यशाचे श्रेय बसचालकाला! रजनीकांत यांनी पत्र लिहून मानले आभार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गेली पाच दशके बॉलीवूडसह साऊथ इंडस्ट्री गाजवणारे मराठमोळे अभिनेते शिवाजीराव गायकवाड ऊर्फ सुपरस्टार रजनीकांत यांना नुकताच चित्रपटसृष्टीतील प्रतिष्ठsचा 51 वा दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. बस पंडक्टर ते सुपरस्टार रजनीकांत असा त्यांचा प्रवास सगळ्यांसाठीच प्रेरणादायी आहे.

दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाल्यानंतर त्यांनी पत्र लिहीत आपल्या यशाचे संपूर्ण श्रेय एका बसचालकाला दिले आहे. रजनीकांत यांनी म्हटलंय, ‘हा पुरस्कार मी माझा मित्र राज बहादूर याला समर्पित करतो. त्यानेच माझ्यातील काwशल्य ओळखले. त्याच्यामुळेच मला अनेक संधी मिळाल्या. माझे मोठे बंधू सत्यनारायण राव यांचेही आभार. मला अभिनेता बनवण्यासाठी त्यांनी खूप मेहनत घेतली. मला अभिनयाचे धडे देणारे गुरू भालचंद्र यांचेदेखील आभार.’ रजनीकांत ज्या बसमध्ये कंडक्टर म्हणून काम करत होते त्या बसचे राज बहादूर हे चालक होते. आजही त्यांच्यातली मैत्री कायम आहे.