सामना ऑनलाईन । मुंबई
शेतकरी नेते आणि खासदार राजू शेट्टी यांनी सामनाच्या फेसबुकपेजवरून लाईव्ह संवाद साधताना सध्या सुरु असलेला शेतकऱ्यांचा संप सरकार पुरस्कृत असल्याचा आरोप केला होता. यानंतर मुंबईतील काही विद्यार्थ्यांनी
#MisGuidedFarmers नावाने हॅशटॅग सुरू केलाय आहे. तसेच या विद्यार्थ्यांनी एक व्हिडीओ देखील बनवला आहे.
या हॅशटॅग खाली चाललेल्या कँपेन मध्ये विद्यार्थ्यांनी केलेला हा व्हिडीयो व्हायरल केला. शेतकऱ्यांच्या सोबत आपण सर्वांनी उभं राहिलं पाहिजे अशी विनंती या व्हिडीयोत करण्यात आली आहे मात्र त्याचवेळी राजकारणाला बळी न पडता शेतकऱ्यांनी अन्नधान्याचा नासाडी करू नये असा संदेश ही देण्यात आला आहे.
देशभरात १ जूनला सुरू झालेल्या शेतकऱ्यांचा १० दिवसीय संप सरकार पुरस्कृत असल्याचा आरोप राजू शेट्टी यांनी केला होता. सामनाच्या फेसबुक लाईव्हमध्ये बोलताना राजू शेट्टी यांनी या संपामागे सरकारी यंत्रणाच आहे की काय असा संशय घ्यायला वाव आहे, असा आरोप केला. महाराष्ट्रामध्ये या आंदोलनाचे नेतृत्व करणारे जे संदीप गिद्दे आहेत, हे गिद्दे महाराष्ट्राच्या कृषीमहोत्सवाच्या इव्हेंट मॅनेजमेंटचे प्रमुख आहेत. एक ठेकेदारच सरकारच्या विरोधात आंदोलन करतो हे न पचणारं आहे, असं शेट्टी म्हणाले.
वाचा संपूर्ण बातमी : हा शेतकरी संप सरकार पुरस्कृत – राजू शेट्टी

























































