राखी सावंतला आलाय पाकिस्तानचा पुळका! सोशल मीडियावर झाली ट्रोल, देशातून हाकलून देण्याची मागणी

राखी सावंत ही नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सतत स्वतःला चर्चेत ठेवत असते. ड्रामा क्वीन म्हणून राखीची ओळख सर्वज्ञात आहेच. राखी मूळातच कुठल्या विषयावर कशी व्यक्त होईल याचाही काही नेम नसतो. 22 एप्रिलला पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या घटनेनंतर अखंड देशात संतापाची लाट उसळली आहे. परंतु राखीने मात्र यावर भलतेच विधान केलेले आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर हिंदुस्थान आणि पाकिस्तान या दोन्ही देशातील तणाव दिवसागणिक वाढत चाललेला आहे. तणावाच्या या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांनी एकमेकांची कोंडी करण्यास सुरुवात केली आहे. अशा वातावरणात राजकारणी, खेळाडू, सेलिब्रेटी सर्वच जण या दहशतवादी हल्ल्याचा निषेध करत आहेत. या सर्व घडामोडीत पाकिस्तानला धडा शिकवण्याची विनंती मोदी सरकारला करत आहेत. असे चित्र सध्या देशात दिसत असूनही, राखीने मात्र पाकिस्तानला पाठिंबा देण्याचे ठरवले आहे.

सध्याच्या घडीला राखीचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये ती म्हणतेय की, मी राखी सावंत आहे. मी खरं बोलेन, खऱ्याशिवाय काहीच बोलणार नाही. पाकिस्तावाले… मी तुमच्यासोबत आहे, जय पाकिस्तान! राखीने शूट केलेला हा व्हिडिओ पाहून अनेकांची तळपायाची आग मस्तकात गेलेली आहे. सध्याच्या घडीला तिच्या व्हिडीओवर प्रतिक्रीयांचा पूर आलाय. यामध्ये अनेकांनी तिलाच हिंदुस्थानबाहेर हकलावे असे म्हटले आहे. हिच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणीही आता सर्वच स्तरातून होऊ लागली आहे.

राखीचे हे असे विचित्र वागणे काही नवीन नाही. राखी ही कायमच काहीतरी विचित्र उद्योग करण्यात आघाडीवर राहिली आहे. त्यामुळेच राखीचा हा पब्लिसिटी स्टंट तिच्यावर पुन्हा उलटणार का हेच आता बघणे हितावह ठरेल.