राखीचा पर्दाफाश, घरातील स्वयंपाक घराला सांगते ‘युकेचं किचन’

2245

विवाहीत असल्याचा दावा करणारी बॉलीवुडची आयटम गर्ल राखी सावंत करवा चौथच्या निमित्ताने पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. पण ही चर्चा तिच्या पतीबद्दल किंवा तिने एकट्याने साजरी केलेल्या करवा चौथची नसून तिच्या घरातल्या स्वयंपाकघराची आहे.

नुकतीच राखीने करवा चौथ साजरी केली. या दिवसाचा व्हिडीओ तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे. मी सध्या युकेमध्ये असून करवा चौथसाठी गाजराचा हलवा बनवत असल्याचं यात राखी सांगत आहे. पण राखी ज्या स्वयंपाकघरात गाजराचा हलवा बनवताना दिसत आहे ते हिंदुस्थानी घरातलं किचन आहे. त्यातील एलपीजी गॅस सिलिंडर, गॅसची शेगडी , त्यावरची भांडी आणि राखीला हलवा बनवण्यासाठी मदत करणारी कामवाली बाईदेखील हिंदुस्थानीच असल्याचं दिसत आहे. यावरुन युजर्सनी राखीला ट्रोल केलं आहे.

व्हिडीओत मित्रांनो मी कुठल्या गावात नसून युकेमध्ये असल्याची राखीने चक्क थाप मारल्याचं दिसत असल्याने राखीचे चाहतेही वैतागले आहेत. काही जणांनी तिला तू कुठल्या युकेबद्दल बोलत आहेस. हिंदु्स्थानचं युके म्हणजे उत्तराखंड. तेथे आहेस का तू असा प्रश्न विचारून काहीजणांनी तिला ट्रोल केलं आहे. तसेच तुझ्या किचनप्रमाणेच तुझं लग्नही खोटं असेल असं सांगत काहीजणांनी तिची खिल्ली उडवली आहे.


View this post on Instagram

Karwachauth par gajar ka halwa bna rahi hai #rakhisawant #karwachauth2019 #bollygossip #bollywood

A post shared by Bollywood Gossip (@bollyg0ssip) on

आपली प्रतिक्रिया द्या