
श्रावण पौर्णिमेनिमित्त बहीण भावाच्या नात्याला दृढ करणारा रक्षाबंधनाचा सण मोठ्या उत्साहात सुरू आहे. या सणानिमित्त अनेक महिला शिर्डीच्या साईबाबांना राखी अर्पण करतात. मंदिरातील पुजारी मंडळानं साईबाबांच्या हाताला राखी बांधली.
साईंच्या शिर्डीत तसे सगळेच उत्सव साजरे केले जातात. आज पहाटेच्या काकड आरतीनंतर बाबांना मंगलस्नान घालण्यात आलं. त्यानंतर साईमूर्तीला भरजरी वस्र घालण्यात आली. यानंतर सुंदरशी मोठी राखी बांबांच्या मूर्तीच्या मनगटावर साई मंदिर पुजाऱ्यांच्या हस्ते बांधण्यात आली.





























































