‘गेम चेंजर’ येतोय, राम चरणच्या नव्या चित्रपटाची घोषणा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राम चरण आणि कियारा अडवाणी यांचा पॉलिटिकल थ्रिलर चित्रपट  ‘गेम चेंजर’लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  राम चरण याच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आज दिग्दर्शक एस. शंकर यांनी व्हिडीओ शेअर करून चित्रपटाच्या  नावाची घोषणा केली. या चित्रपटात अंजली, एस. जे. सूर्या आणि जयराम यांच्या भूमिका आहेत. राम चरण आणि कियारा यांचा हा दुसरा चित्रपट आहे. नुकताच राम चरणने 38 वा वाढदिवस साजरा केला. सेटवर त्याने दोन दिवस आधी दिग्दर्शक शंकर, कियारा आणि सदस्यांसोबत वाढदिवस साजरा केला.