
दाक्षिणात्य अभिनेता धनुष आणि ऐश्वर्या रजनीकांत यांनी 18 वर्षांचे नाते तोडत घटस्फोट घेत असल्याचे जाहीर केले आहे. त्यांच्या या घोषणेने त्यांच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. त्यांच्या वेगळे होण्याच्या निर्णयावर सेलिब्रिटी आणि त्यांच्या चाहत्यांकडून अनेक प्रतिक्रिया येत आहेत. त्यातच दिग्दर्शक रामगोपाल वर्मा यांनी लग्न आणि घटस्फोटाबाबत ट्विट केले आहे. समाज आणि आपल्या पूर्वजांनी आपल्यावर लादलेली लग्न ही कुप्रथा असल्याचे ट्विट रामगोपाल वर्मा यांनी केले आहे.
Only divorces should be celebrated with sangeet because of getting liberated and marriages should happen quietly in process of testing each other’s danger qualities
— Ram Gopal Varma (@RGVzoomin) January 18, 2022
रामगोपाल वर्मा यांनी लग्न आणि घटस्फोटाबाबत तीन ट्विट केले आहेत. पहिल्या ट्विटमध्ये रामगोपाल वर्मा यांनी म्हटले आहे की, घटस्फोट ही जल्लोषात साजरी करण्याची घटना आहे. त्याचा संगीताने जल्लोष करायला हवा. तुम्ही एक बंधनातून मुक्त होतात. तसेच एकमेकांना ओळखण्याची आणि एकमेकांचे धोकादायक गुण जाणण्याची प्रक्रिया असलेले लग्न चुपचाप करण्यात यावे ,असे त्यांनी म्हटले आहे. दुसऱ्या ट्विटमध्ये ते म्हणतात, लग्न ही कुप्रथा आहे. आपला समाज आणि आपल्या पूर्वजांनी ती आपल्यावर लादली आहे. सुखदुःखाचे निरंतर चक्र कायम सुरू राहवे, यासाठी त्यांनी ही कुप्रथा आपल्यावर लादली आहे, असे त्यांनी दुसऱ्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
Marriage is the most evil custom thrust upon society by our nasty ancestors in promulgating a continuous cycle of unhappiness and sadness
— Ram Gopal Varma (@RGVzoomin) January 18, 2022
रामगोपाल वर्मा यांच्या या ट्विटवरून वादाला तोंड फुटले आहे. त्यांनी त्यांच्या ट्विटमध्ये धनुष आणि ऐश्वर्या रजनीकांत याचा थेट उल्लेख केलेला नाही. मात्र, धुनष आणि ऐश्वर्या यांच्या वेगळे होण्याच्या घोषणेनंतरच हे ट्विट त्यांनी केले आहे. त्यांचे हे ट्विट आणि त्यांनी व्यक्त केलेले मत अयोग्य असल्याचे सांगत अनेकांनी त्यांना फटकारले आहे. ‘तुमच्या ट्विटनुसार लग्नानंतर चारपाच दिवसांनी प्रत्येकाने प्रेमाच्या शोधात फिरावे काय, मात्र, या गोष्टी अॅमेझॉनवर मिळत नाहीत, सर’, असे एका युजरने म्हटले आहे. लग्न हा काही खेळ किंवा नाटक नाही. मनात येईल तेव्हा त्याची सुरुवात करावी आणि इच्छा होईल त्यावेळी त्यातून बाहेर पडावे. ही एकमेकांमधील प्रेमभावना आणि स्नेह यांचे गहिरे नाते आहे. मात्र, सध्या विनाकारण नाते तोडून वेगळे होण्याचा निर्णय अनेकजण घेत आहेत, असेही मत व्यक्त करण्यात आले आहे.
वर्माजी, तुम्ही पश्चिमेकडील देशात जन्म घ्यायला हवा होता. त्या देशांमध्ये गे, लेस्बियन आणि ट्रान्स सेक्सुअल या संस्कृती आहेत. आपली विवाह आणि कुटुंबसंस्था एका निश्चित दिशेने मार्गक्रमण करते. नुसते जगत राहणे हे जीवनाचे ध्येय नाही. तसे असेल तर प्राणी आणि मानव यात काय फरक आहे, असे एका युजरने म्हटले आहे. लग्न हे लाँग टर्म अॅक्ट्रशन आहे, असे मत व्यक्त करत एका युजरने रामगोपाल वर्मा यांच्याशी मताशी सहमती व्यक्त केली आहे. राम गोपाल वर्मा नेहमी वादग्रस्त ट्विटमुळे चर्चेत असतात. आता त्यांनी लग्न आणि घटस्फोट याबाबत केलेल्या ट्विटमुळे ते पुन्हा चर्चेत आले आहेत.





























































