राम मंदिर : पाकिस्तानी क्रिकेटपटूने ट्विट केले ‘जय श्रीराम’, म्हणाला वाईटावर चांगल्याचा विजय

1638

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आजीवन बंदी घातलेल्या पाकिस्तानी लेगस्पिनर दानिश कनेरिया याने राम मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्याबद्दल ट्विट केले आहे. आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर भगवान रामाच्या चित्रासह आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून आनंद व्यक्त केला.

राम मंदिरासंदर्भात पाकिस्तानमध्ये टीव्ही वाहिन्यांवर विखारी भाषा बोलली जात आहे आणि मंदिराच्याबद्दल लोकांमध्ये बरीच चर्चा होत आहे, तर एका पाकिस्तानी हिंदू क्रिकेटपटूने राम मंदिराबद्दल (डॅनिश कनेरिया) आनंद व्यक्त केला आहे. भगवान श्री राम याच्याबद्दल दानिश कनेरियाच्या मनात किती भाव आणि श्रद्धा आहे हे या ट्विटवरून स्पष्ट होते आहे. दानिश कनेरिया याने बुधवारी राम मंदिर भूमीपूजनापूर्वी आपल्या ट्विटर अकाउंटवर हे चित्र शेअर केले.

दानिशने ट्विटर अकाउंटवर चित्रासह पोस्ट केलेल्या संदेशात लिहिले आहे की, “भगवान रामांची सुंदरता त्याच्या नावात नसून त्याच्या चारित्र्यात आहे. भगवान राम हा वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक आहे.आज जगभरात आनंदाची लाट आहे. हे अत्यंत समाधानाचे क्षण आहेत. ” दानिशच्या या ट्विटचे हिंदुस्थानी जनतेकडून कौतुक होत आहे.

त्याच वेळी जेव्हा राहुल रोशन नावाच्या व्यक्तीने ‘सुरक्षित रहा’ असे लिहिले तेव्हा, “आम्ही सुरक्षित आहोत आणि आमच्या धार्मिक श्रद्धेबद्दल कोणालाही काही अडचण नसावी. भगवान राम यांचे जीवन आपल्याला ऐक्य आणि बंधुतेबद्दल शिकवते “, असे त्याने ट्विट केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या