
हिंदुस्थान आणि श्रीलंकेदरम्यान अरबी समुद्रामधील राम सेतू कधी आणि कसा बनवण्यात आला, याची उत्तरे शोधण्यासाठी हिंदुस्थानच्या पुरातत्त्व खात्याकडून संशोधन सुरू करण्यात येणार आहे. या अंतर्गत यावर्षी राम सेतू परिसरामध्ये समुद्राच्या पाण्याखाली एक विशेष प्रकल्प राबवला जाणार आहे.
एएसआयच्या केंद्रीय सल्लागार समितीने सीएसआयआर-नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ ओशनोग्राफीच्या संशोधन अर्जाला मंजुरी दिली आहे. संशोधनासाठी एनआयओकडून सिंधू संकल्प किंवा सिंधू साधना या जहाजांचा वापर केला जाण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. ही दोन्ही जहाजे पाण्याच्या पातळीखाली 35 ते 40 मीटरपर्यंतचे नमुने गोळा करू शकतात.


























































