माँसाहेबांच्या आठवणीने रमाधाम गहिवरले; ममता दिनानिमित्त ठाणे, पालघर, रायगडात विविध उपक्रम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ममता दिनानिमित्त आज रमाधाम वृद्धाश्रमात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माँसाहेबांच्या आठवणीने रमाधाम गहिवरून गेले. ठाणे, पालघर व रायगड जिह्यांतही विविध उपक्रम पार पडले. रमाधाममधील आजी-आजोबांनी माँसाहेबांच्या अनेक आठवणींना उजाळा दिला.

रमाधामचे अध्यक्ष चंदूमामा वैद्य व सिद्धिविनायक गणपती मंदिर समितीचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी माँसाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी निकेशबुवा व मंडळी यांच्या ज्ञानाई भजनी मंडळाचा कार्यक्रम झाला. यावेळी खानावळे येथील सरपंच मनोहर लबडे यांच्यासह नऊ सदस्य बिनविरोध निवडून आल्याबद्दल चंदूमामा वैद्य यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. शिवसहकार सेनेच्या वतीने धान्यवाटपदेखील करण्यात आले. शिवसेना रायगड जिल्हा सल्लागार बबन पाटील, नवी मुंबई उपजिल्हाप्रमुख मनोहर गायखे, अरविंद नारकर, उत्तम परबळकर, खालापूर तालुकाप्रमुख संतोष विचारे, संजय देशमुखराव, शहरप्रमुख सुनील पाटील, महिला आघाडीच्या रेश्मा आंग्रे, सुरेखा खेडेकर, सारिका निकम, महेश केदारी, गणेश ढोमसे, यश सावंत, संतोष पाटील, शिवाजी मोरे आदी उपस्थित होते.