‘श्री रामायण एक्सप्रेस’ 10 मार्चनंतर धावणार

392

भारतीय रेल्वेवर लवकरच प्रभू रामचंद्राच्या स्पर्शाने पावन झालेल्या तीर्थस्थळांची यात्रा करण्यासाठी ‘श्री रामायण एक्सप्रेस’ चालवण्यात येणार आहे. या ट्रेनच्या आतील इंटेरिअरवर रामायणातील घटना चितारण्यात येणार आहेत. या एक्सप्रेसमध्ये प्रवासादरम्यान ‘सुश्राव्य भजने’ गायली जाणार आहेत. या रामायण एक्सप्रेसला 10 मार्चनंतर चालवण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

रेल्वेची खानपान सेवा सांभाळणार्‍या आयआरसीटीसीने या नव्या रामायण एक्सप्रेसच्या योजनेवर काम चालू केले आहे. भारतीय रेल्वे होळीनंतर ही ट्रेन चालवण्याची शक्यता आहे. यापूर्वीदेखील रामाच्या नावाची एक विशेष ट्रेन चालवण्यात येत होती. प्रभू रामाशी संबंधित तीर्थस्थळांना भेट देत होती. श्री रामायण एक्सप्रेसची सेवा 14 नोव्हेंबरपासून सुरू झाली होती. त्यातून 800 प्रवासी प्रवास करू शकत होते.

असा होऊ शकतो प्रवास

या ट्रेनच्या प्रवाशांना नंदीग्राम, सीतामढी, जनकपुरी, वाराणसी, प्रयाग, श्रंगवेरपूर, चित्रकूट, नाशिक, हंपी, अयोध्या आणि रामेश्वरम या तीर्थ स्थळांना भेट देऊन आपली तीर्थयात्रा करता येणार आहे. नव्या रामायण एक्सप्रेसच्या यात्रेचा तपशील अद्याप जारी करण्यात आलेला नाही.

आपली प्रतिक्रिया द्या