
2004 साली काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पंतप्रधान पद स्विकारायला हवे होते असे मत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले आहे. तसेच राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पुढे जाऊ शकत नाही अशी टीकाही आठवले यांनी केली.
मध्य प्रदेशमध्ये एका पत्रकार परिषदेत बोलताना आठवले म्हणाले की, 2004 साली सोनिया गांधी यांनी पंतप्रधान व्हावे असा प्रस्ताव मी ठेवला होता. आता कमला हॅरीस या अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष होऊ शकतात तर सोनिया गांधीही पंतप्रधान झाल्या असत्या. सोनिया गांधीनी पंतप्रधान नाकारल्यानंतर शरद पवारांना पंतप्रधान करायला हवे होते असे आठवले म्हणाले. पवार पंतप्रधान झाले असते तर आता जी काँग्रेसची दुरवस्था झाली आहे ती झाली नसते, तसेच राहुल गांधी काँग्रेस पक्षाला पुढे नेऊ शकत नाही असेही आठवले म्हणाले.





























































