रामदेव बाबा घेणार कोरोना लस

अॅलोपॅथीवर टीका करून डॉक्टरांचा रोष ओढवून घेणाऱया योगगुरू रामदेव बाबांनी आता घूमजाव करीत आपण कोरोना प्रतिबंधक लस घेणार असल्याचे जाहीर केले आहे. त्याचबरोबर बाबा रामदेव यांनी सर्वांना लस घेण्याचे आवाहन केले आहे. तसेच योगा कोरोनापासून होणाऱया समस्या कमी करण्यास मदत करत असल्याचेदेखील सांगायला ते विसरले नाहीत. तर योगा आणि आयुर्वेदाचा अभ्यास होणे गरजेचे असल्याचे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या