Baba Ramdev महिलांच्या कपड्यांवरील वक्तव्य भोवणार? बाबा रामदेव यांना महिला आयोगाची नोटीस

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ठाण्यातील योगा कार्यक्रमात महिलांबाबत केलेल्या एका वादग्रस्त विधानामुळे बाबा रामदेव अडचणीत आले आहेत. अशातच महिला आयोगानेही याची दखल घेत नोटीस बजावल्याने बाबा रामदेव यांच्या अडचणी वाढल्या आहेत. महाराष्ट्र महिला आयोगाच्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत माहिती देण्यात आली आहे.

महाराष्ट्रातील ठाणे येथील एका कार्यक्रमात तुमच्याद्वारे करण्यात आलेल्या वक्तव्याबाबत महिला आयोगामध्ये तक्रार मिळाली आहे. तुमचे विधान महिलांचा सन्मान आणि प्रतिष्ठेला हानी पोहोचवणारे आहे. या वक्तव्याविरोधात समाजमाध्यमांवर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत, असा उल्लेख तक्रारकर्त्याने आपल्या तक्रारीत केला आहे. या तक्रारीला अनुसरून राज्य महिला आयोगाचे कलम 12 (2) आणि 12 (3) 1993 अन्वये तुम्हाला या वक्तव्याबाबत खुलासा करण्यासाठी 3 दिवसांचा अवधी देण्यात येत आहे, अशी नोटीस महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी बाबा रामदेव यांना पाठवली आहे.

काय आहे प्रकरण?

ठाण्यातील हायलँड मैदानात योग शिबीर आणि महिलांचे महासंमेलन अशा दोन कार्यक्रमांचे ठाण्यामध्ये आयोजन करण्यात आले होते. योगासनांसाठी महिलांनी सलवार कमीज परीधान केली होती आणि महासंमेलनासाठी त्यांनी सोबत साड्या आणल्या होत्या. मात्र योगा शिबीर आणि महासंमेलनाच्या दरम्यान अवधी न मिळाल्याने महिलांना सलवार कमीज ऐवजी साड्या परीधान करता आल्या नव्हत्या. याबाबत बोलताना बाबा रामदेव म्हणाले की, महिला साड्या नेसून चांगल्या वाटतात, महिला सलवार सूटमध्ये सुद्धा चांगल्या वाटतात. आणि माझ्या नजरेने काही घातलं नाही तरी चांगल्या दिसतात. बाबा रामदेव यांच्या या कार्यक्रमाला खासदार श्रीकांत शिंदे आणि अमृता फडणवीसही उपस्थित होत्या.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)