आयर्लंडविरुद्ध खेळणे म्हणजे क्लब क्रिकेटचा व, रमीज राजा यांची टीका

आयर्लंडविरुद्ध खेळणे म्हणजे क्लब क्रिकेटचा अनुभव वाटतोय. केवळ दोनच पॅमेरे. डीआरएसची कमतरता. पाकिस्तानने आयर्लंडविरुद्ध टी-20 सामने खेळून स्वतःचेच नुकसान केल्याची जहरी टीका माजी कसोटीपटू रमीज राजा यांनी खुद्द पीसीबीवरच केली आहे. विशेष म्हणजे ते स्वतःही काही काळ पीसीबीचे अध्यक्ष होते.

सध्या पाकिस्तानचा संघ आयर्लंडच्या दौऱयावर असून तो तिथे तीन टी-20 सामन्यांची मालिका खेळत आहे. दोन सामने झाले असून मालिका 1-1 अशी बरोबरीत आहे. पाकिस्तानचा संघ मालिकेसाठी आयर्लंडला गेला असला तरी या मालिकेला अत्यंत दुय्यम कव्हरेज मिळत असून ही मालिका आंतरराष्ट्रीय नव्हे तर क्लब क्रिकेटची वाटतेय. या सामन्याचे प्रक्षेपणही अत्यंत दुय्यम असल्यामुळे पाकिस्तानने ही मालिका खेळून स्वतःचेच नुकसान केले आहे. या मालिकेतून पाकिस्तानला फार काही मिळणार नसल्याची टीकाही राजा यांनी केली आहे. 2 जूनपासून सुरू होणाऱया टी-20 वर्ल्ड कपच्या तयारीच्या दृष्टीने सध्या सुरू असलेली मालिका महत्त्वाची मानली जात होती. दोन्ही संघ एकाच गटात खेळत असल्यामुळे या मालिका कितपत लाभ होणार, हे स्पर्धेतच कळेल. या मालिकेचे सारे आयोजन क्लब क्रिकेटला साजेसे आहे. दोन पॅमेऱयांवर सामन्याचे थेट प्रक्षेपण केले जात असल्यामुळे सामना पाहताना क्लब क्रिकेटचाच फिल येतोय. फलंदाजांनी मारलेला फटकाही पाहता येत नाही. तसेच चांगली गोलंदाजीही पाहायला मिळत नसल्याची खंत त्यांनी बोलून दाखवली. पाकिस्तानी संघाचे जगभरात चाहते आहेत आणि अशा स्थितीत खेळून पीसीबीने पाकिस्तानी क्रिकेटचेच नुकसान केल्याचे राजा यांनी एका यूटय़ूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.