70 वर्षानंतर भगवान रामाला दाखवणार नैवेद्य, 100 एकरवर पसरणार रामलल्ला शहर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

70 वर्षानंतर अयोध्येत रामललाला नैवेद्य दाखवण्यात येणार आहे. तसेच 9 फेब्रुवारी पूर्वी राममंदिर ट्रस्टची स्थापना करण्यात येणार आहे. तसेच 2 एप्रिल रोजी रामनवमीच्या दिवशी मंदिराच्या बांधकामास सुरूवात होईल असेही म्हटले जाते.

वर्षाच्या पहिल्या दिवशी रामलल्ला आणि हनुमानगढीचे दर्शन करण्यासाठी 70 हजारहून अधिक भाविक येण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर दररोज 18 हजार भाविक दर्शन घेत आहेत. मंदिरातील दानपेटी दर 15 दिवसांनी उघडली जाते. तसेच अयोध्येतील सर्व हॉटेल आणि धर्मशाला भाविकांनी भरल्या आहेत.

बाबरी मशीदीचे पक्षकार इकबाल अन्सारी रामलल्ला मंदिराचे मुख्य पुजारी सत्येंद्र यांची भेट घेऊन त्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देणार आहेत. यादरम्यान श्रीरामलला विराजमान शहराच्या नियोजनासाठी सरकारी अधिकारी इथे दौरा करत आहेत. एका अधिकार्‍याने दिलेल्या माहितीनुसार प्रस्तावित श्रीरामलल्ला शहराची व्याप्ती ही 100 एकर असेल. तसेच या शहरात आजूबाजूच्या गावांचाही समावेशही करण्यात येईल. हे शहर तिरुपती आणि व्हॅटिकन सिटीच्या धर्तीवर वसवले जाईल असे अधिकार्‍यांनी सांगितले. तसेच अयोध्येत 9 फलाटांचे नवीन स्थानक बनवण्याचीही सरकारची योजना आहे.