रेल्वेच्या डब्यांमध्ये भरते रामपूरवाडीची शाळा!

728

एखादी शाळा रेल्वेच्या डब्यांमध्ये भरते असे सांगितले तर कोणाचाही विश्वास बसणार नाही. मात्र राहाता तालुक्यातील रामपूरवाडी गावची जिल्हा परिषदेची शाळा चक्क रेल्वेच्या भरते. रेल्वेच्या डब्याची प्रतीकात्मक इमारत रंगवून त्यात शाळा भरवण्यात येते. त्यामुळे ही शाळा रेल्वेच्या डब्यातच भरली आहे, असे वाटते.

राहाता तालुक्यातील रामपुरवाडी गाव म्हनजे तालुक्याच शेवटच टोक. याच गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेची दयनीय अवस्था झाली होती. त्यात अवकाळी पावसाने झोडपल्याने शाळेची जूनी इमारत मोडकळीस आली होती. त्यानंतर शाळेतील शिक्षकांनी एकत्र येत ग्रामस्थांच्या मदतीने शाळेचे रूप पालटवण्याचा निर्णय घेतला आणि त्यातूनच रेल्वेची प्रतिकृती असणारी रंगरंगोटी व डागडूजी शाळेला करण्यात आली. त्यामुळे शाळेचे रूप पालटून गेले. आज प्रत्येकाला हेवा वाटावा व विद्यार्थ्यांना आकर्षण वाटेल अशी ही शाळा दिसत आहे.

या शाळेतील शिक्षक पालकांच्या सहकार्यातून नेहमीच नवनवीन प्रयोग करत असतात. जेणेकरून विद्यार्थ्यांना शिक्षणात गोडी निर्माण होईल. असाच प्रयोग शाळेला रंगरोगोटी करताना घेतला आणि त्याचच रुपांतर आज रामपुरवाडी एक्सप्रेस झाल्याचे प्रयोगशील शिक्षक वैभव गोसावी यांनी सांगितलं. शाळेत जाताना तुझी ट्रेन लेट होईल, लवकर जा असे म्हणून आम्हाला शाळेत पाठवतात अशी प्रतिक्रिया विद्यार्थांनी दिली आहे. एकीकडे मराठी शाळांचा टक्का घसरत असताना राज्यातील अनेक शिक्षक नवनवीन प्रयोग राबवून शिक्षणाचा दर्जा वाढवत आहेत. रामपुरवाडीतील शिक्षकांनी याचा आदर्श घालून दिला आहे. मराठी शाळांसाठी सरकारने अनुदान दिल्यास मराठी शाळांचा टक्का अजून वाढेल असे मत पालकांनी व्यक्त केले. वैभव गोसावी, प्रसाद तिकोणे, शिवनाथ गायके, राजेंद्र जगताप हे शिक्षक आणि शाळा व्यवस्थापनाने शाळेचे रुपडे बदवण्यासाठी मेहनत घेतली. या कामात ग्रामस्थांनीही मोठी मदत केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या