पुणे – रामटेकडीतील रोकेम प्रकल्पातील कचऱ्याला आग

प्रातिनिधिक फोटो

हडपसरमधील रामटेकडी परिसरातील कचरा प्रक्रिया प्रकल्पातील कचऱ्याला आज दुपारी आग लागली. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली.

रामटेकडी परिसरात रोकेम ग्रीन एनर्जी प्रकल्प आहे. आज दुपारी पावणेचारच्या सुमारास प्रकल्पातील कचऱ्याला आग लागली होती. घटनेची माहिती अग्निशमन दलाला कळविण्यात आली. रोकेम प्रकल्पात कचऱ्यावर प्रक्रिया होत नाही. तेथे कचरा साठविला जात असल्याने दुर्गंधी पसरत असल्यामुळे स्थानिक नगरसेवक आणि नागरिकांनी तीन दिवसांपूर्वी रोकेम प्रकल्प परिसरात आंदोलन केले होते.

आपली प्रतिक्रिया द्या