रणबीर आणि कतरिना पुन्हा एकत्र?

3353

असं म्हणतात की, वेळ ही सगळ्या दुःखांवरचा रामबाण उपाय आहे. बॉलिवूडच्या बाबतीतही काहीसं असंच आहे. नाहीतर प्रेमात पडून वेगळं झालेल्या जोड्या आपल्याला पुन्हा जुळलेल्या पाहायला मिळाल्या नसत्या. असंच काहीसं रणबीर आणि कतरिनाच्या बाबतीत झालं आहे.

2009 मध्ये प्रदर्शित झालेल्या अजब प्रेम की गजब कहानी या चित्रपटावेळी रणबीर आणि कतरिनाला प्रेमाची चाहुल लागली होती. पण त्यावेळी रणबीर दीपिकासोबतच्या नात्यात होता. कतरिनामुळे त्याच्या आणि दीपिकाच्या प्रेमात मिठाचा खडा पडला आणि त्यांचं ब्रेकअप झालं. त्यानंतर रणबीर आणि कतरिना जवळपास सात वर्षं एकमेकांसोबत होते. 2016मध्ये त्या दोघांचं ब्रेकअप झालं आणि ते वेगळे झाले. त्यानंतर ते कधीच एकत्र दिसले नव्हते.

पण आता असं समजतंय की ते दोघेही एका जाहिरातीच्या निमित्ताने एकत्र दिसणार आहेत. एका मोबाईलच्या जाहिरातीसाठी रणबीर आणि कतरिना एकत्र येणार आहेत. त्यानंतर एखादा चित्रपटही एकत्र करण्याचा त्यांचा मानस आहे. 2017मध्ये प्रदर्शित झालेल्या जग्गा जासूस या चित्रपटात ते दोघंही शेवटचं एकत्र दिसले होते.

आपली प्रतिक्रिया द्या