
बॉलीवूड अभिनेत्री नीतू कपूर यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत रणबीर कपूरच्या आरोग्यासंदर्भात अपडेट जारी केली आहे. सोशल मीडियावर सतत चर्चा सुरू होती की रणबीर कोविड पॉझिटिव्ह आहे. आता नीतू यांनी या बातमीला दुजोरा दिला आहे. नीतू यांनी इंस्टाग्रामवर मुलगा रणबीरचा फोटो शेअर केला आहे त्यासोबत कॅप्शन लिहिली आहे की, “तुम्ही सारे काळजीने विचारपूस करत आहात आणि प्रार्थनाही करत आहात याकरिता शुभेच्छा. रणबीर कपूर कोरोना पॉझिटिव्ह आहे. त्याच्यावर औषधोपचार सुरू आहे आणि त्याच्या तब्येतीत सुधारणा होत आहे. तो घरातच सेल्फ क्वारंटाइन आहे आणि सर्व प्रकारचे नियम पाळत आहे.”
रणबीर कपूरच्या तब्येतीसंदर्भात सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा सुरू होत्या. आतापर्यंत त्याला अधिकृत दुजोरा दिला नव्हता. काही रिपोर्ट्सनुसार रणधीर कपूर यांनी रणबीरची तब्येत ठीक नसल्याचं सांगितलं होतं. मात्र त्याला कोणता आजार झाला हे मात्र स्पष्ट झाले नव्हते. नीतू यांच्या या पोस्ट नंतर कोविड-19 पॉझिटिव्ह असल्याचं स्पष्ट झालं आहे.
नीतू यांची ही पोस्ट व्हायरल झाली असून सोशल मीडियावर लाखों प्रतिक्रिया आल्या आहेत. त्याच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी याकरिता चाहते प्रार्थना देत आहेत.




























































