राणी सावरगाव ते रेवातांडा रस्त्याची दयनीय अवस्था

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गंगाखेड तालुक्यातील राणी सावरगांव ते रेवातांडा या रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. गंगाखेड तालुक्यातील राणी सावरगांव ते रेवातांडा हे अंतर 6 किलोमीटरचे असून याच मार्गालगत कुंडगिरवाडी, सोमला नाईकतांडा, थावरु नाईकतांडा, चंदू नाईकतांडा व रेवातांडा ही गावे येतात. मतदारसंख्या 5 हजार असून एकूण लोक संख्य 15 हजार असून या सर्व गावाचा राणी सावरगांव जनसंपर्क असतो.

या रस्त्याने वाहनच काय पण माणसांना देखील चालता येत नाही अशी अवस्था निर्माण झाली आहे. या रस्त्याच्या दुरुस्तीची तसेच 6 नळकांडी पुलाची आवश्यकता आहे. या प्रकरणी जि.प. सदस्य तथा सभापती श्रीनिवास मुंडे यांना निवेदन देण्यात आली होती. जि.प. सदस्य करुणाताई कुंडगिर पं.स. सदस्य महानंदा जाधव व नंदू खात्रे त्याच बरोबर या मतदार संघात दोन जिल्हा परिषद सदस्य व 2 पंचायत समिती सदस्य असून रस्त्यासाठी कोणी पुढाकार घेत नाही. विद्यमान आमदार डॉ. मधुसूदन केंद्रे हे निवडून केल्यापासून गावाला परत भेटले नाहीत. एकंदरीत या रस्त्याची दयनीय अवस्था कायम आहे.
यामुळे विद्यार्थी, शेतकरी, शेतमजूर, आजारी व्यक्ती यांना रस्ता नसल्याने जिवंतपणी मरण यातना सहन कराव्या लागत आहेत. रस्ता तत्काळ दुरुस्त झाला नाही तर होणाऱ्या आमदारकीच्या निवडणुकीत मतदान करणार नसल्याचा पवित्रा नागरिकांनी घेतला आहे.

या भागात सध्या अतिवृष्टीने जोर धरला आहे. वरील गाववासीयाने 21 ऑगस्ट रोजी जिल्हा अधिकारी मुख्यकार्यकारी अधिकारी जि.प. परभणी यांच्याकडे प्रत्यक्ष कार्यालयात हजर राहून 200 स्वाक्षरीनिशी निवेदन सादर केले होते. या निवेदनात जर आमचा 30 दिवसाच्या आत रस्त्याचे काम नाही झाले तर आगामी विधानसभा निवडणुकीत मतदान करणार नसल्याबाबत नमूद केले होते.