
Ranji Trophy 2025-26 पहिल्या दिवसापासूनच खेळाडूंची चमकदार कामगिरी पाहायला मिळत आहे. पहिल्या दिवशी ऋतुराज गायकवाड, केएस भारत, इशान किशन या फलंदाजांनी जबरदस्त खेळाचं प्रदर्शन केलं. तर रणजी करंडकाच्या दुसऱ्या दिवशी जम्मू काश्मिर संघाचा कर्णधार पारस डोगराने आपला क्साल दाखवून देत शतक ठोकलं. दुसऱ्या दिवसाअखेर जम्मू काश्मिरने 7 गड्यांच्या मोबदल्यात 273 धावा केल्या आहेत. तर कर्णधार पारस डोगरा 112 धावांवर नाबाद खेळत आहे.
पारस डोगराने रणजी करंडकातील आपलं 32व शतक साजरं केल. या शतकासोबत त्याने अजय शर्माला मागे टाकलं आहे. रणजी करंडकाच्या इतिहासात सर्वाधिक शतक ठोकणाऱ्या खेळाडूंच्या यादीमध्ये पारस डोगराने आता दुसऱ्या क्रमांकावर उडी मारली आहे. या बाबतीत पहिल्या क्रमांकावर वासीम जाफर असून त्याने 40 शतके ठोकली आहेत. तर तिसऱ्या क्रमांकवर असलेल्या अजय शर्माने 31 शतके ठोकली आहे. तसेच रणजीमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या क्रमवारीतही पारस डोगरा दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने आतापर्यंत 9500 धावा केल्या आहेत. तर रणजीमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू वासीम जाफरने 12038 धावा केल्या आहेत.