अभिनेता आमीर खाननंतर आता अभिनेता रणवीर सिंगचासुद्धा डीप फेक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये रणवीर कोणत्या तरी राजकीय पक्षाला सपोर्ट करताना दिसत आहे. हा व्हिडीओ रणवीरच्या नुकत्याच वाराणसीला गेलेल्या भेटीचा आहे, ज्यामध्ये तो शहराशी संबंधित त्याचे अनुभव शेअर करत होता. वाराणसीत फॅशन डिझायनर मनीष मल्होत्राचा फॅशन शो आयोजित करण्यात आला होता.