
रणवीर सिंगची मुख्य भूमिका असलेल्या धुरंदर या सिनेमाने जगभरात खळबळ माजवली होती. सुपरहिट ठरलेल्या या चित्रपटाचा दुसरा भाग मार्च महिन्यात येणार असल्याचे त्याच वेळी चित्रपटाच्या शेवटी जाहीर करण्यात आले होते. त्यामुळे चाहते आतुरतेने दुसऱ्या भागाची वाट पाहत होते. अखेर आज प्रेक्षकांना आज दुसऱ्या भागाची झलक पाहायला मिळाली. आज धुरंदरच्या दुसऱ्या भागाचा टिझर प्रदर्शित करण्यात आला आहे.
ये नया हिंदुस्थान है, ये घरमें घुसेगा भी और मारेगा भी… अशा टॅगलाईनने धुरंदरचा दुसरा टिझर जिओ स्टुडिओकडून रिलीज करण्यात आला आहे. १ मिनिटं १२ सेकंदच्या या टीझरचा पहिलाच सिन प्रेक्षकांच्या अंगावर काटा आणतो. धुरंदरच्या पहिल्या पार्टमध्ये हमजा अलीचे पाकिस्तानातील काम दाखवण्यात आले होते. तर आता दुसऱ्या पार्टमध्ये हमजाचे पाकिस्तानात येण्या आधीचे आयुष्य दाखवण्यात येणार आहे.




























































