वायनाडमध्ये लढणारे राहुल गांधी ‘बाहेरचे’ नव्हते का? कोथरूडमध्ये दानवेंचा सवाल

578

राज्यातील विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. 21 ऑक्टोबरला होणाऱ्या मतदानापूर्वी राज्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. पुण्यात कोथरूडमधून विद्यमान आमदार मेधा कुलकर्णी यांना डावलून चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी देण्यावरूनही राजकारण चांगलेच तापत आहे. सुरुवातीला ब्राह्मण महासंघाने चंद्रकांत पाटलांना विरोध केला आणि स्थानिक ब्राह्मण उमेदवार देण्याची मागणी केली. परंतु भाजपने मनधरणी केल्यानंतर त्यांचा विरोध मावळला.

कोथरूडमध्ये महायुतीचे चंद्रकांत पाटील यांच्याविरुद्ध महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे किशोर शिंदे यांनी दंड थोपटले आहे. किशोर शिंदे यांना इतर पक्षांनीही पाठिंबा दिला आहे. तसेच प्रसारमाध्यमांशी बोलताना शिंदे यांनी ब्राह्मण संघटनांचाही आपल्याला पाठिंबा असल्याचे म्हटले. चंद्रकांत पाटील यांना ब्राह्मण महासंघाचा विरोध कमी झाल्यानंतर आता कोथरूडमध्ये ‘स्थानिक उमेदवार’ आणि ‘बाहेरचा उमेदवार’ असा वाद रंगवला जात आहे. हा वाद निरर्थक असल्याचे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे म्हणाले आहेत.

विधानसभा२०१९ – महाराष्ट्रातील चुरशीच्या लढती, वाचा सविस्तर…

सोमवारी चंद्रकात पाटील यांच्या कोथरूड मतदारसंघात रावसाहेब दानवे यांनी सभा घेतली. या सभेमध्ये त्यांनी स्थानिक आणि बाहेरचा असा वाद रंगवणाऱ्यांचा चांगलाच समाचार घेतला. यावेळी त्यांनी लोकसभा निवडणुकीदरम्यान आपला पारंपारिक अमेठी मतदारसंघासह केरळमधील वायनाड येथून निवडणूक लढवली याचा उल्लेख करून चंद्रकांत पाटलांना बाहेरचा म्हणून विरोध करणाऱ्यांवर निशाणा साधला. केरळमधील वायनाडमध्ये निवडणूक लढवणारे राहुल गांधी बाहरचे नव्हते का? असा सवाल दावने यांनी केला.

‘पाटील’ कसा फटका लगावतो समजतही नाही! चंद्रकांत पाटलांचा पवारांना टोला

…तरच पक्षात घेतो
आचारसंहिता लागण्यापूर्वी भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात मेगाभरती सुरू होती. याबाबत बोलताना रावसाहेब दानवे म्हणाले की, ‘चांगला माणूस असेल तर आम्ही त्याला पक्षात घेतो. वॉशिंग मशीनमध्ये टाकतो. गुजरातचा निरमा लावतो आणि स्वच्छ करून त्याला कामाला लावतो.’

आपली प्रतिक्रिया द्या