बलात्काराचा आरोप असलेले स्वामी नित्यानंद देशातून फरार

1577
swami-nithyananda

एका सेक्स सीडीमुळे चर्चेत आलेले आणि बलात्कार तसेच लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप असलेले स्वंयघोषित गुरू स्वामी नित्यानंद देशातून फरार झाले आहेत. गुजरात पोलिसांनी ही माहिती दिली आहे.

आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, गुजरात पोलिसांनी नित्यानंद देश सोडून पळून गेल्याची माहिती दिली आहे. तर दुसरीकडे गुजरात पोलिसांनी अद्याप इंटरपोलशी संपर्क साधला नसल्याचा तसेच ब्ल्यू कॉर्नर नोटीस जारी न केल्याचा आरोप त्यांच्यावर होत आहे. गुजरात उच्च न्यायालयाच्या आदेशांनुसार यापूर्वीच नित्यानंद यांच्यावर अपहरण आणि खंडणी असे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच त्यांची एक सेक्स सीडी व्हायरल झाल्यानंतर त्यांच्यावर बलात्कार आणि लैंगिक शोषणाचे आरोपही केले गेले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या