
उत्तर प्रदेशमध्ये बलात्कार आरोपीने पीडितेच्या वडिलांची गोळ्या घालून हत्या केली आहे. पोलिसांनी या प्रकरणी आरोपीला अटक केली आहे.
उत्तर प्रदेशच्या फिरोजाबादमध्ये एका अल्पवयीन मुलीवर एका नराधमाने बलात्कार केला होता. या प्रकरणी पीडित मुलीने आणि वडिलांनी आरोपीच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. ही तक्रार मागे घेण्यास आरोपीने पीडितेच्या वडिलांवर दबाव टाकला होता. तसेच जीवे मारण्याची धमकीही दिली होती. पीडित मुलगी आणि तिचे वडील मागे हटत नसल्याने आरोपीने पीडित मुलीच्या वडिलां गोळ्या झाडल्या. त्यात त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर आरोपी फरार होता. आरोपीच शोध घेत असताना एका बाईकवरून आरोपीने पोलिसांवर गोळी झाडली. पोलिसांनी हा हल्ला परतवून लावून आरोपीला अटक केली. या चकमकीत दोन पोलीस अधिकारी जखमीही झाले आहेत.























































