
बलात्कारासाठी 20 वर्षांची शिक्षा झालेल्या आरोपीला जामीन देण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला. या शिक्षेला अंतरिम स्थगिती देण्याची मागणीही न्यायालयाने फेटाळून लावली. आरोपीने या शिक्षेविरोधात केलेल्या अपील याचिकेवर लवकरात लवकर सुनावणी घेण्याचे आदेश न्यायालयाने दिले.
जयू शांताराम राणे असे या आरोपीचे नाव आहे. शिक्षेला अंतरिम स्थगिती देण्यासाठी व जामिनासाठी राणेने याचिका केली होती. न्या. नितीन सुर्यवंशी यांच्या एकल पीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. बलात्कार, विनयभंग व पोक्सो कायद्याअंतर्गत राणेला 20 वर्षांची शिक्षा झाली आहे.




























































